स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अनन्यसाधारण - शाम सिंधी - Saptahik Sandesh

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अनन्यसाधारण – शाम सिंधी

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सचिव शाम सिंधी यांनी व्यक्त केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांचे तर्फे करमाळा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती १४१ वी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्यातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले प्रतिमापूजन हभप पुराहित घुगे महाराज भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके, पुरोहित रवींद्र विद्वत अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना शाम सिंधी म्हणाले की सावरकर हे थोर राष्ट्रभक्त, प्रखर विज्ञानवादी बुद्धिवंत होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी आपल्या आयुष्याची आहुती देऊन राष्ट्रनिष्ठेशी कोणतीही तडजोड केली नाही, अत्यंत धैर्याने विपरीत परिस्थितीत ब्रिटिशांशी त्यांनी सशस्त्र संघर्ष केला. त्यांचा आदर्श ठेवून देव देश आणि धर्मासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी जागृत आणि गरजेचे आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी लवकरच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास संतोष कुलकर्णी,शाम सिंधी, नरेंद्रसिंह ठाकुर,उपाध्यक्ष रवींद्र विद्वत पत्रकार दिनेश मडके, हरीभाऊ कुलकर्णी,नरेंद्र सिंह ठाकुर शंकर कुलकर्णी , सचिन कुलकर्णीगुरुजी, आनंद पाटील, सिध्देश्वर दास मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!