कानाड गल्ली येथील शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले – स्वच्छतेची नागरिकांची मागणी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कानाड गल्ली येथील शौचालय तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. तेथील स्वच्छता करावी या मागणीचे निवेदन करमाळा नगर परिषद मुख्याधिकारी यांना नगरसेविका राजश्री माने यांच्या मार्गदर्शनाखाली कानाड गल्लीतील महिला ,नागरीकांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करमाळा शहरातील कानाड गल्ली परिसरातील स्त्री व पुरुष शौचालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली आहे. शौचालयाचे आऊटलेट, सैप्टीक टँक नादुरुस्त असल्याने यामध्ये मैला बाहेर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत आहे. शौचालय परिसर स्वच्छ करा व शौचालय परिसरात पुढीलप्रमाणे कामे करावे कानाड येथे सैप्टीक टँक बांधणे, स्त्री व पुरुष शौचालयाचे आउटलेट दुरुस्त करणे, कंपाऊंड वॉल बांधणे, गेट बसविणे, शौचालय परिसरात कॉंक्रीटीकरण करणे असे निवेदन मुख्याधिकारी करमाळा यांना दिले आहे.
यावेळी माजी नगरसेवक सचिन घोलप, टिंकु ढवळे,आयुब पठाण, तसेच कानाड गल्ली येथील महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.