तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी २ कोटी १५ लाख निधी मंजूर -आमदार शिंदे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री, हिवरवाडी, रामवाडी, मांजरगाव, खातगाव, पांगरे, कोंढेज, वडगाव व कुंभारगाव या गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून २ कोटी १५ लाख निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना मंजूर करण्यात आली होती. त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १३९ ग्रामपंचायतींना इमारत बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे.
या इमारतीचे बांधकाम ग्रीन बिल्डिंग संकल्पना अंमलात आणून नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुजीवन, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर करून पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीतजास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करणे आवश्यक आहे. हे कार्यालय बांधण्यासाठी बिटरगाव श्री सह , हिवरवाडी, रामवाडी, मांजरगाव, खातगाव, पांगरेला प्रत्येकी २० लाख व कोंढेज, वडगाव व कुंभारगावला प्रत्येकी २५ लाख मंजूर झाले आहेत.