ऍथलेटिक्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या सई भगतचा गौंडरे येथे सत्कार
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – गौंडरे (ता. करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात आज (दि. २ जुलै) ऍथलेटिक्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या सई भालचंद्र भगत या खेळाडूचा सत्कार करण्यात आला.
नाशिकमध्ये सहाव्या राष्ट्रीय SDPF क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये 800 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. फलटण येथून आलेल्या ८ वर्षांच्या सई भगत हिने 200 मीटर ऍथलेटिक्स प्रकारात अतिशय उत्तम कामगिरी करत 14 वर्ष वयोगटात तृतीय क्रमांक.
मिळवला आहे. तसेच वयाच्या साडे सहा वर्षांपासून धावणारी सई ही 5 किलोमिटर न थांबता 34 मिनिटांमध्ये धावणारी सर्वात लहान अथेलेटिक्स म्हणून अथेलेटिक्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे तिची दखल घेतली आहे.
या तिच्या कामगिरीमुळे धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे येथे साई भगत हिचा भव्य सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी सईचे मार्गदर्शक कोच अजित कर्णे व तिचे वडील भालचंद्र भगत त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक बापू निळ व संस्थेचे सचिव हरिदास काळे, खेळाचे शिक्षक इंद्रजीत मुळीक,ज्येष्ठ शिक्षक कोळेकर सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक यशवंत कोळेकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुखदेव गिलबिले यांनी केले.या सत्कारच्या प्रसंगी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
चंद्रभागा मोरे या अत्यंत सात्विक, कष्टाळू, स्वाभिमानी आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. वृद्धापकाळात सर्व मोरे कुटुंबीयांनी त्यांची समाजात आदर्शवत ठरावी अशी सेवा केली. चंद्रभागा मोरे यांच्या पाठीमागे दोन मुले, पार्वती काळे व नंदाबाई नलवडे या दोन मुली,11 नातवंडे व 18 पणतू असा मोठा परिवार आहे. सावडण्याच्या दिवशी मोरे कुटुंबीयांनी नदीपात्रात रक्षाविसर्जन न करता प्रदूषण टाळून स्वतःच्या शेतातच संपूर्ण रक्षा विसर्जन केली व त्या जागी स्मृतीवृक्ष लावला. गेली अनेक वर्षापासून मांजरगावमध्ये अशा पद्धतीने सावडण्याच्या दिवशी स्मृतीवृक्ष लावण्याची झालेली सुरुवात आता आसपासच्या अनेक गावांमध्ये राबवली जात आहे. या गोष्टीचा आदर्श घेऊन सर्वच समाजबांधवांनी अशा प्रथांचे अनुकरण करावे अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी आणि विवेकी समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे.