वडशिवणे येथील सचिन साळुंखे यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड
केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील सचिन साळुंखे याने महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली. त्याला चवथ्या प्रयत्नात हे यश मिळाले.
सचिन साळुंखे हा पुणे येथे महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करीत होते. त्याने आत्तापर्यंत चार वेळा परिक्षा दिली होती पण थोड्या-थोड्या गुणाने यशाने हुलकावणी दिली. पण त्याने जिद्द सोडली नाही. त्याचा विवाह झाला आहे पण त्याने आशा सोडली नव्हती. पण अखेर चवथ्यावेळी त्याला यश मिळाले.
त्याचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा वडशिवणे व माध्यमिक शिक्षण केम येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये झाले. त्यानंतर पुणे येथून कॅम्पुटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्याने फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्व परिक्षा दिली होती तर मुख्य परिक्षा जुलै 2022 मध्ये दिली होती व त्यानंतर मुलाखत होऊन अंतिम निकाल जाहिर झाला. यात त्याची विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली.
त्याने मिळविलेल्या यशाबद्दल माजी संचालक गोरख जगदाळे, लश्नमण मोरे, कालीदास पन्हाळकर, पोपट साळुंखे, श्रीमंत कवडे, युवा नेते अमरजित साळुंखे, महंत जयंत गिरी महाराज केम, गणेश जगदाळे, रोहिदास पाटिल, उमेश साळुखे, शहाजी भोसले, कोंडलकर गुरूजी यांनी अभिनंदन केले त्याचे वडशिवणे,केम परिसरात कौतुक होत आहे.