दत्तपेठेतील गटारी संदर्भातील कामांकडे पालिकेने लक्ष द्यावे
समस्या – करमाळा शहरातील विषेशत: दत्तपेठ भागातील गटारी गेले कित्येक दिवसांपासून साफसफाई केल्या गेलेल्या नाहीत. सदर परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झालेले आहे. या ठिकाणी गटारीचे उंची कमी असुन या भागातील गटारीतील पाणी हे कायम रस्त्यावरून वाहत असते. गटारीच्या दोन्ही बाजुला गवत झाडे झुडपे वाढलेली आहेत. तसेच दत्तपेठ मधुन फंड गल्ली कडे जाणारा रस्त्याला लागून गटारीला मोठा खड्डा खोदुन ठेवला असुन येथे दररोज एक तरी वाहन अडकून अपघात होत आहेत.
या ठिकाणी नगरपरिषदेने लक्ष घालुन लवकरात लवकर गटारींची उंची वाढवून व रस्त्यावर लोखंडी जाळी टाकुन तोडगा काढणे खुप गरजेचे आहे. तरी देखील नगरपरिषद मात्र या कडे कायम दुर्लक्ष करीत आहे. सदर भागात शालेय विद्यार्थीही ये जा करत असतात. याठिकाणी एखादी दुर्घटनेनंतर घडल्यानंतर नगरपरिषद जागी होणार का ?असा प्रश्न नागरिकांकडुन उपस्थित होत आहे.
समस्या मांडणारे – नंदकिशोर सुरेश काटकर, दत्तपेठ, करमाळा.
आपल्या परिसरातील समस्यांवर आवाज उठविण्यासाठी आमच्या पर्यंत माहिती पोहोचवा – Click Here