केम येथील लोकरे परिवाराने मूकबधीर व आश्रम शाळेला दिले गोडजेवण
केम (संजय जाधव) – केम येथील विठाबाई भिवा पाडुळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त उद्योजक आजीनाथ लोकरे परिवाराच्या वतीने आश्रमशाळा व मूकबधीर शाळेतील १९० विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. या भोजनाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुदर्शन तळेकर यांनी कौतूक करून लोकरे परिवाराचा सन्मान केला.
या प्रसंगी आजीनाथ लोकरे म्हणाले कि आज आक्षम शाळेतील या विदयार्थाना भोजन वाढताना मला माझा परिस्थितीची आठवण आली. माझी परिस्थिती गरिबीची होती माझे वडिल दारूडे व आई लोकाच्या बांधावर कामाला जात होत्या. माझे शिक्षण परिस्थितीमुळे अर्धवट झाले. मी पुण्याला ट्रकवर क्लिनर म्हणून काम केले. नंतर मी ड्रायव्हिंग शिकलो. आता माझाकडे १५ टॅंकर आहेत माझे आश्रमशाळेतील विदयार्थाना सहकार्य राहिल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या वेळी वैशाली लोकरे, बाई तळेकर, केतन लोकरे, गणेश तळेकर,कुंडलिक तळेकर, केमेश्वर सुरवसे आदिजण उपस्थित होते. या उपक्रमाचे केम परिसरात कौतूक केले जात आहे.