मटाक्याचे आकडे फाडणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा शहरात जीन मैदानात रस्त्यावरच्या माणसांकडून पैसे घेऊन मटक्याचे आकडे फाडणाऱ्या विरूध्द करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० जुलैला दुपारी साडेबारा वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तौफिक काझी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ३० जुलैला गोपीयन बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जीन मैदानाजवळ एक इसम मटक्याचे आकडे फाडत आहे. त्यानंतर जीन मैदानात गेलो असता तेथे सर्फराज गफार राज (रा.फंडगल्ली, करमाळा) हा पांढऱ्या रंगाच्या स्लीपबूकवर निळ्या शाईच्या पेनने मटक्याचे आकडे फाडत असल्याचे आढळून आला. यावेळी त्याच्याकडून पांढऱ्या रंगाचे स्लीपबुक, नीळ्या रंगाचा बॉलपेन व ९५० रु. रोख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पो.नि.पोपट टिळेकर हे करत आहेत.
साठेनगर भागातही एकास पकडले…
अशाचप्रकारे नागरीकांकडून मुंबई मटका फाडताना सठेनगर येथील बाबा बाळू आलाट हा सापडला असून त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचे स्लीप बुक, निळ्या शाईचा बॉलपेन व रोख १०५० रूपये सापडले आहेत. ते जप्त केले असून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.