कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी संभाजीनगर येथील आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे - Saptahik Sandesh

कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी संभाजीनगर येथील आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे

केम (संजय जाधव) – शेतकरी मोलमजूर,विधवा,निराधार महिला, दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून दोन ते तीन लाख शेतकरी,दिव्यांग बांधव, विधवा,निराधार परितक्ता महिला मोर्चामध्ये सामील होतील, तरी करमाळा तालुक्यातील 200 गाड्या शेतकरी मोलमजुर निराधार महिला दिव्यांग बांधवांच्या मागणीसाठी निघणार आहे. सर्व शेतकरी दिव्याग बांधवांनी मोठ्या प्रमाणात आपल्या हक्कासाठी छत्रपती संभाजी नगरला उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, प्रहारचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, सोलापूर जिल्हा सरचिटणीस बापू नेते तळेकर युवा जिल्हा उपाध्यक्ष युनूस पठाण युवा तालुका अध्यक्ष विकी मोरे, महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे, उपाध्यक्ष पप्पू ढवळे सोमनाथ जाधव सोलापूर जिल्हा आघाडी कार्याध्यक्ष पप्पू कोंडलकर आदीजन उपस्थित होते.

प्रहार संघटनेच्या आक्रोश मोर्चात खालील प्रमुख मागण्या केल्या जाणार आहेत.

  • 9 ऑगस्ट रोजी असलेल्या क्रांतीदिनी दिव्यांगांच्या मानधनात वाढ करून ते 6000 हजार रुपये करावे
  • विना अट घरकुल देण्यात यावें,
  • भूमिहीन दिव्यांगांना २०० स्क्वेअर फुट सरकारी जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावी,
  • शेतकरी,शेतमजूर यांच्या पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे MNRG रोजगार हमी योजनेमार्फत करणे,
  • नव्याने युवा धोरण व बेरोजगार युवकांसाठी किमान 5000 कोटींची तरतूद करणे
  • पेपर फुटी कायदा बनविणे,
  • शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी स्वातंत्र्य आर्थिक विकास महामंडळ तयार करणे.
  • कांद्याला हमीभाव देण्यात यावा कांदा निर्यात बंदी संदर्भात हे ठाम धोरण असावें
  • घरकुलांसाठी 5 लाख रुपये व शहर व ग्रामीण भागात समान निधी असावा
  • शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये विषमता हटवून समानता आणावी
  • शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व पुढील दोन वर्ष कर्जाच्या मुदल मध्ये माफी असणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!