केम-तुळजापूर व केम-पंढरपूर या तिर्थास जाण्यासाठी एसटी सुरू करण्याची मागणी

केम (संजय जाधव) – केम व परिसरातील भाविकांना तुळजापूर व पंढरपूर या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी एकही थेट एसटी नसल्याने या भागातील भाविकांची व प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी या भागासाठी एसटी सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस महिला आघाडीच्या तालुका कार्याध्यक्षा पल्लवी रणश्रृंगारे यांनी करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्धारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि केम येथून तुळजापूर व पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संस्खा मोठया प्रमाणावर आहे या तिर्थास जाण्यासाठी एकही डायरेक्ट एसटी नाही. त्यामुळे, प्रवासी,महिला भाविकांची गैरसोय होत आहे जर या एसटी बसेस सुरू केल्यास केम, वडशिवणे, पाथुर्डी, मलवडी, सातोली,भोगेवाडी उपळवाटे, येथील प्रवासी व भाविकांना सोयीचे होणार आहे या एसटी साठी वारवार महिलांची मागणी आहे. केम तुळजापूर ही एसटी घोटी,साडे,सालसे आवाटी परंडा बार्शी मार्गे तुळजापूर तर केम पंढरपूर उपळवाटे,दहिवली,टेंभूर्णी मार्गे पंढरपूर अशी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
