बनावट दारु विक्री बाबत मनसे जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे यांचे निवेदन - कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा.. - Saptahik Sandesh

बनावट दारु विक्री बाबत मनसे जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे यांचे निवेदन – कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शहर व ग्रामीण भागातील कोर्टी, साडे, कंदर, केम, जेऊर जातेगाव वीट आवाटी अशा मोठ्या गावांमध्ये व शहरातील हाॅटेलमध्ये बनावट दारुची विक्री होत आहे. या बनावट दारुमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. याकडे उत्पादन विभागाचे अधिकारी कारवाई करण्याबाबत दूर्लक्ष करत आहेत. ताबडतोब याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अन्यथा करमाळ्या मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

बनावट दारु स्वस्तात घेऊन भरमसाट नफा कमवला जात आहे, यातून तरुणही व्यसनाधीन होत आहेत व सरकारचा महसूलही बुडत आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा महाराष्ट्र नव निर्माण सेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे, तसेच तालुक्यातील सर्व हॉटेल तसेच विक्री केंद्र तपासणी करुन त्वरीत कारवाई करण्यात यावी, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते स्वतः मनसे स्टाईलने कारवाई करतील, कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण त्याची नोंद घ्यावी असाही इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!