करमाळ्यात श्रीराम मंदिरात नागपंचमीनिमित्ताने ब्राह्मण समाजाच्यावतीने श्रावणी कार्यक्रम संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील वेताळ पेठ येथील श्रीराम मंदिरात नागपंचमीनिमित्ताने ब्राह्मण समाजाच्यावतीने श्रावणी कार्यक्रम करण्यात आले, या कार्यक्रमात सर्व ब्राह्मणवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोरोहित्य बार्शी येथील श्री परांजपे गुरुजी यांनी केले. याप्रसंगी सर्व ब्रम्हवृंदांना श्री श्रीधरपंत सुर्यपुजारी यांचेवतीने दुधाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रम्हवृंद संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.



