प्रफुल्ल शिंदे यांच्याकडून दत्त मंदिरास एलईडी बोर्ड भेट

करमाळा (ता.९) : करमाळा येथील व्यावसायिक प्रफुल्ल शिंदे यांनी शहरातील किल्ला विभाग येथील दत्त मंदिरास नाम फलक असलेला एलईडी बोर्ड अर्पण केला. यावेळी जगताप गटाचे युवा नेते तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांच्यासह किल्ला विभागातील अनेक भाविक उपस्थित होते.

श्री.शिंदे यांनी याआधी किल्ला वेस व सावंत गल्ली येथील हनुमान मंदिर, वेताळ पेठ येथील राम मंदिर, पोथरे येथील शनिमंदिर यासह तालुक्यातील अनेक मंदिरांना नामफलक असलेले एल ई डी बोर्ड अर्पण केले आहेत. शंभूराजे जगताप यांनी श्री. शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रफुल्ल शिंदे यांनी दिलेल्या बोर्ड बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


