लोकशिक्षिका स्व.लिलाताई दिवेकर जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा - स्वरा कुलकर्णी,सान्वी पोळ,प्राची वाघमारे जिल्ह्यात प्रथम… - Saptahik Sandesh

लोकशिक्षिका स्व.लिलाताई दिवेकर जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा – स्वरा कुलकर्णी,सान्वी पोळ,प्राची वाघमारे जिल्ह्यात प्रथम…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : 26 जुलै हा लोकशिक्षीका लिलाताई दिवेकर यांचा स्मृतीदिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. आपले अवघे जीवन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी वाहिलेल्या थोर शिक्षिका स्व. लिलाताई दिवेकर यांच्या स्मृती विविध उपक्रमांनी जपण्याचा प्रयत्न यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश भाऊ करे-पाटील करत असून, स्मृतीदिनाचे औचित्य साधत यशकल्याणी संस्था ,शिक्षण विभाग सोलापूर व जिल्हा इंग्लीश टीचर्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.


यावर्षी सोलापूर जिल्हयातील अकरा तालुक्यातून सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत आपल्या इंग्रजी वक्तृत्वाची चूणूक दाखवली. विजेत्या स्पर्धकांचा यशकल्याणी संस्थेच्या वतीने मोठया रकमेच्या रोख बक्षीसांसह सन्मानचिन्ह, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.


जिल्हास्तरीय विजेते पुढील प्रमाणे..


पाचवी / सहावी गट
प्रथम – कु.स्वरा प्रविण कुलकर्णी (साडे हायस्कूल साडे )
द्वितीय – अल्फीया निसार पठाण ( जिजामाता कन्या प्रशाला अकलूज ) तृतीय- विश्वब्रम्ह होटगे ( जि.प. प्रा. शाळा कोरसे गाव अक्कलकोट ) ,उत्तेजनार्थ – अनुष्का गणेश सुतार -(.न्यु इंग्लीश स्कूल मंगळवेढा ), उत्तेजनार्थ – अतीफ आदमशहा मकानदार (यशवंत विद्या. औराद, दक्षिण सोलापूर )


सातवी / आठवी गट

प्रथम क्रमांक – सानवी अतुल पोळ ( क. अण्णासाहेब जगताप वि.करमाळा ), द्वितीय क्रमांक – गार्गी गणेश वाघमारे (जि.प. प्रा. शाळा पोखरापूर मोहोळ ) तृतीय क्रमांक – फैजान निसार शेख ( सिल्वर ज्युबीली हायस्कूल बार्शी ) उत्तेजनार्थ – राधीका नितीन गोरे ( कवठेकर प्रशाला , पंढरपूर ) उत्तेजनार्थ – उत्कर्ष मारूती माळी ( के एस बी पाटील विद्या मोहोळ.


नववी / दहावी गट

प्रथम क्रमांक – प्राची नंदकुमार वाघमारे ( यशवंतराव चव्हाण वि. फळवणी माळशिरस ) द्वितीय क्रमांक – अक्षरा श्रीशैल म्हमाणे ( ग्रामीण विद्या. चपळगाव अक्कलकोट ) तृतीय क्रमांक -सार्थक सिध्देश्वर लेंगरे ( डीएचके प्रशाला पंढरपूर ) उत्तेजनार्थ : अक्षरा सचिन बरडे ( नूतन विद्यालय, कुर्डुवाडी ) उत्तेजनार्थ : आर्या अभिजित काळे ( के.एस.बी. पाटील विद्या अनगर )

यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील , माध्य. शिक्षणाधिकारी सचिन जगताप सो. गटविकास अधिकारी मनोज राऊत , गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, प्रा गुरूनाथ मुचंडे , प्रा अशपाक काझी , जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड ,सचिव प्रा.धनाजी राऊत, उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब दाढे, उपाध्यक्ष प्रा. शशीकांत चंदनशिवे करमाळा तालुका अध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके, सचिव प्रा. गोपाळराव तकीक यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!