ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन व मुस्लीम समाजाच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तके वाटप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील नामदेवराव जगताप उर्दू शाळेत नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व पुस्तके वाटपाचा कार्यक्रम भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता, यावेळी सन राईस क्लासचे संचालक प्रा इब्राहीम मुजावर, डॉ.समीर बागवान,ॲड.अलीम पठाण हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय सावंत, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन चे मार्गदर्शक समीर शेख, शालेय शिक्षण समिती चे उपाध्यक्ष इकबाल शेख ,सकल मुस्लीम समाज अध्यक्ष जमीर सय्यद, राष्ट्रवादीचे आझाद शेख, कलाम फाऊंडेशन चे सचिव रमजान बेग, रहनुमा ट्रस्टचे सचिव सुरज शेख उद्योजक जावेद आतार यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना मुजावर यांनी सांगितले की, मुस्लीम समाजातील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी पालकांनी, विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्गाने शिक्षणाप्रती जागरूक राहून मुलांन मध्ये शिक्षण घेण्यासाठी रुची दाखविणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता पुढील पिढी घडविण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

ॲड.अलीम पठाण, डॉ.समीर बागवान यांनीही आपले विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिशान कबीर, अलीम भाई पठाण, शाहीद भाई बेग, आरबाज भाई बेग, कलीम शेख (सामाजिक कार्यकर्ते)व उर्दू शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होता.

