कै.सा.ना.जगताप मुली नं.१ शाळेत स्वातंत्र्यादिन उत्साहात साजरा

करमाळा (दि.१५) – आज 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१ न. प.करमाळा या शाळेचा ध्वजारोहण कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.अमृतसिंग परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाला.राष्ट्रगीत,राज्यगीत, ध्वजगीत इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु.ओवी माहुले,शरयू फरतडे व इयत्ता चौथीतील भैरवी लटके यांनी हार्मोनियम वाजवून उत्कृष्ट गायीले व त्यांना साथ सर्व विद्यार्थ्यांनींनी दिली. या सर्व विद्यार्थिनींची उत्कृष्ट तयारी श्री.रमेश नामदे सर यांनी घेतली. कार्यक्रमास शाळेचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.सर्व मान्यवर व पालकांचे स्वागत मुख्याध्यापक श्री.दयानंद चौधरी सर यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत स्वातंत्र्य रॅली काढली रॅलीतील थोर महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी व युनिफॉर्म विद्यार्थिनी,सर्व शिक्षक,पालक सहभागी झाले होते रॅलीने शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.या स्वातंत्र्य रॅलीचा नगरपरिषद येथील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर समारोप झाला.मुख्याधिकारी माननीय श्री.सचिन तपसे साहेब यांचे हस्ते सर्व शिक्षकांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना एक झाड भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन श्रीम.संध्या शिंदे मॅडम यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार श्री. भालचंद्र निमगिरे सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.निलेश धर्माधिकारी सर,सौ.सुवर्णा वेळापुरे मॅडम,सौ.सुनीता क्षीरसागर, सौ. मोनिका चौधरी मॅडम,श्रीम.तृप्ती बेडकुते मॅडम, श्रीम.भाग्यश्री पिसे मॅडम यांनी परिश्रम घेतले.