सारिका जाधव यांची आरोग्य सेविकापदी निवड

केम (संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथील शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कूल मधे कायर्रत असणाऱ्या सहशिक्षिका सारिका जाधव यांची सोलापूर जिल्हा आरोग्य विभागात आरोग्य सेविका पदी निवड झाली आहे.

आर्थिक परिस्थितीवर मात करत व जिद्द आणि चिकाटीने त्यांनी हे यश संपादन केले आहे. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्री चा हात असतो अस समाजात बोलल जात परंतु एखाद्या यशस्वी स्त्री च्या पाठीमागे जर पुरुष उभा असेल तर स्त्री सुद्धा यशस्वी होवू शकते. सारिका जाधव यांना त्यांचे पती रामा जाधव व सासू सासरे यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्यांना हे यश मिळाले. या यशाबद्दल 15 ऑगस्ट रोजी शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.


