स्व.सुभाष आण्णा सावंत यांनी कष्टकऱ्यांसाठी केलेल्या साधनेचा वारसा अखंड सुरू आहे : ह.भ.प.पांडुरंग उगले -

स्व.सुभाष आण्णा सावंत यांनी कष्टकऱ्यांसाठी केलेल्या साधनेचा वारसा अखंड सुरू आहे : ह.भ.प.पांडुरंग उगले

0

रक्तदान शिबिरात ११० जणांचे रक्तदान…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांनी आजन्म कष्टकरी, गोरगरीब वर्गासाठी संघर्ष रुपी साधना केली, त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, त्यांच्या नंतरही कष्टकरी वर्गाच्या सेवेचा हा वारसा ॲड.राहुल सावंत व सावंत कुटुंबीयांकडून पुढे चालू राहत आहे, हीच स्व. आण्णांना खरी आदरांजली आहे, असे मत ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले यांनी केले.

कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त छत्रपती शिवाजी तरुण मंडळ सावंत गल्ली आणि करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने करमाळ्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जामखेड रोडवरील सावंत फार्म हाऊस येथे कीर्तन, रक्तदान शिबिर आणि श्रीदेविचामाळ येथील मूकबधिर शाळेत अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात श्री कमलाभवानी ब्लड बँक यांना तब्बल ११० जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

शहर व तालुक्यातील मान्यवरांकडून दुपारी बारा वाजता स्व. सुभाष अण्णा सावंत यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ॲड. एस.पी. लुणावत, नरसिंहआप्पा चिवटे, ह.भ.प. विलास जाधव, भीमराव लोंढे, निशांत खारगे, दिपक चव्हाण, सचिन काळे, मनोज राखुंडे आणि कु. जान्हवी सावंत यांनी आपल्या मनोगतातून स्व. आण्णांच्या स्मृतींना उजाळा दिला.


यावेळी ॲड. राहुल सावंत यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला यशवंत संजयमामा शिंदे, शहाजी देशमुख सर, डॉ. वसंत पुंडे, प्रा. रामदास झोळ, लालासाहेब जगताप, शेखर तात्या गाडे, बापूराव देशमुख, राजेंद्रसिंह राजेभोसले, उद्धव दादा माळी, तानाजी झोळ, सुजित बागल, प्रभाकर शिंदे, किसनअण्णा शिंदे, विठ्ठल शिंदे, अंकुश शिंदे, संतोष पाटील, आर.आर. मोरे सर, डॉ. हरिदास केवारे, कन्हैयालाल देवी, अमोदशेठ संचेती, अल्ताफशेठ तांबोळी मदन देवी, जितेंद्र लुनिया, नितीन घोलप, महादेव फंड, राजेंद्र आव्हाड आदीजण उपस्थित होते.

तसेच ॲड.नवनाथ राखुंडे, प्रवीण जाधव, प्रकाश झिंजाडे, आशिष गायकवाड, बिभीषण आवटे, संतोष वारे, डॉ. रोहन पाटील, डॉ. विशाल शेटे,डॉ. बाबूराव लावंड, डॉ. अनुप खोसे, ॲड. अजित विघ्ने, ॲड. एम. डी. कांबळे, ॲड. किसन मांगले, ॲड. सचिन लोंढे, ॲड. लता पाटील, ॲड. सविता शिंदे, ॲड. नानासाहेब शिंदे, ॲड. जयदीप देवकर, ॲड. सुहास मोरे, भोजराज सुरवसे, दत्तात्रय अडसूळ, किरण फुंदे, विलास बरडे, प्रताप बरडे, गौतम ढाणे, आजिनाथ भागडे, तात्या पाटील, शिवराज जगताप, भाऊसाहेब काळे, आनंद भांडवलकर, दादा नरसाळे, बाळासाहेब रोडे, पोपट सरडे, भागवत वाघमोडे, सुरेश भोगल, शशिकांत केकाण, सतीश नीळ, मानसिंग खंडागळे, दौलत वाघमोडे, डॉ. अभिजित मुरूमकर, बिभीषण खरात, माधव नलवडे, नामदेव शेगडे, रावसाहेब शिंदे, विजय रोडगे सर, मनोज पितळे, विकी मंडलेचा, उत्कर्ष गांधी, राजाभाऊ कदम, नितीन आढाव, धनंजय शिंदे, राजेंद्र घाडगे, मनोज गोडसे यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी माजी नगरसेवक संजय सावंत, डॉ. संकेत सावंत, पै. गणेश सावंत, गौरव सावंत, वालचंद रोडगे, विठ्ठल रासकर, सागर सामसे, शिवराज गाढवे, ज्ञानेश्वर गोसावी, सतीश खंडागळे, मोहम्मद पठाण, शरद वाडेकर, कैलास स्वामी, बापू उबाळे, वैभव सावंत, फारुख जमादार, विठ्ठल गायकवाड, गजानन गावडे, बापू नलवडे, दादा सुरवसे, विशाल रासकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!