डेंगू, मलेरिया सारखे आजार रोखण्यासाठी शहरात औषध फवारणी करण्यात यावी – नगर पालिकेला निवेदन

करमाळा (दि.६) – करमाळा शहरामध्ये गटारी, नाली अस्वच्छ असल्यामुळे डेंगू, मलेरिया, चिकणगुनिया यासारखे आजाराचे रुग्ण वाढत असून शहरातील नागरिकांची शारीरिक व आर्थिक हानी होत असल्यामुळे करमाळा शहरामध्ये आठ दिवसाच्या आत औषध फवारणी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भीम आर्मी संघटनेच्या वतीने करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांना देण्यात आले आहे.
यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास भीम आर्मी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी भीम आर्मी संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष विशाल जाधव व इतर सदस्य उपस्थित होते.





