फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन
करमाळा (दि.१५) – करमाळा तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरतेच्या लुटीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केले आहे त्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची सुरुवातीला जिल्हा नेते यशपाल कांबळे, जालिंदर गायकवाड जिल्हा संघटक, विलास कांबळे जिल्हा संघटक,जयश्रीताई सावंत महिला तालुकाध्यक्षा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते यशपाल कांबळे हे होते.
यावेळी जिल्हा नेते उमेश(बालाजी)पोळ तालुकाध्यक्ष प्रा. नवनाथ साळवे, ता.महासचिव नंदू कांबळे सर, यांची भाषणे झाली. या वेळी फडणवीस यांच्या विधानाचा त्यांनी आपल्या भाषणातून निषेध केला.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा नेते मच्छिन्द्र चव्हाण, ता. उपाध्यक्ष उपसरपंच शिवाजी भोसले,ता. उपाध्यक्ष लक्समन भालेराव, ता. संघटक बाळासाहेब कांबळे,ता. निरीक्षक लक्समन कांबळे, भाग्यश्री गरड, सारिका गरड,रणजित कांबळे, मयूर कांबळे, कालिदास पवार,बाळासाहेब गायकवाड, अंकुश कांबळे, संदीप रेगुडे, राजरत्न कांबळे,नवनाथ भालेराव, विनोद रोडे, विलास काळे,श्रीमंत साळवे,श्रावण सरवदे, विक्रम साळवे,किशोर कांबळे,सुगत कांबळे,आकाश कांबळे,कचरू वाघमारे, बाळासाहेब कांबळे, प्रेमचंद कांबळे, लक्ष्मण कांबळे,सचिन गायकवाड,अमोल गायकवाड, सुरेश जाधव,बाळू गायकवाड, प्रवीण कांबळे,पत्रकार ज्ञानदेव काकडे ,दिपक नागटिळक,गणेश कांबळे,राहुल आलाट,बौद्धचार्य सावताहारी कांबळे,फिरोज शेख उपस्थित होते. या कार्यकामाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.