हॉटेल व्यावसायिक मोहनशेठ गुलाटी यांचे निधन
करमाळा (दि.१६) – करमाळा शहरातील एसटी स्टँड शेजारील हॉटेल शेरे पंजाबचे मालक मोहनशेठ (रविंद्र) भगतसिंह गुलाटी (वय – ६३) यांचे आज (दि. १६) पहाटे साडेचारच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. आज दुपारी करमाळा येथील दत्त मंदिराच्या पाठीमागील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील लोकांची उपस्थिती होती. मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.