केम मधील धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित
केम (संजय जाधव) – केम मधील धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळ व मेडिकेअर ब्लड सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केम येथील संभाजी नगर भागात रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते. या शिबीरात एकूण ५१ जणानी केले रक्तदान केले.
या शिबीराचे उद्घाटन श्री उत्तरेश्वर परिवर्तन आघाडिचे अजितदादा तळेकर व सर्व सभासद यांच्या हस्ते झाले.
या उदघाटन प्रसंगी अजित तळेकर म्हणाले कि, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आपण केलेल्या रक्तामुळे मनुष्याचे प्राण वाचतात त्यामुळे रक्तदाना सारखे दुसरे पुण्य कोणते नाही. या मंडळाचे अध्यक्ष दत्ताभाऊ तळेकर व त्यांचे सहकारी वर्षातून तीन वेळा रक्तदान शिबीर आयोजीत करतात याचे कौतूक करावे तैवढे थोडेच आहे. इतर मंडळानी याचा आदर्श घेण्यासारखा आहे.
या शिबीराला कुर्डुवाडी येथील युवा नेते उमेश भाऊ पाटिल यांनी भेट दिली. त्यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतूक केले. या वेळी अच्युत काका पाटिल महावीर तळेकर, बापुराव तळेकर, गणेश आबा तळेकर समीर दादा तळेकर, सागर दौड, सागर कुडें युवराज तळेकर विष्णू अवघडे, भारत नागणे गोरख पारखे लक्षमण सुरवसे, आदि उपस्थित होते या शिबीरासाठी दत्ता भाऊ तळेकर,संग्राम तळेकर रोहिदास खरवडे, ओंकार जाधव अक्षय खाडे, विशाल जाधव सूरज बेद्रे, नितीन तळेकर फारूक शेख महेश तळेकर गणेश नागणे, मोण्या खरवडे, अभिजीत तळेकर यांनी परिश्रम घेतले.