करमाळा-हिवरवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ चिवटे यांच्या हस्ते संपन्न
करमाळा (दि.२१) : वर्षानुवर्षे रखडलेल्या करमाळा-हिवरवाडी या दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना महेश चिवटे म्हणाले की, करमाळा हिवरवाडी रस्ता गेली 25 वर्षापासून दुरावस्थेत होता. या रस्त्यासाठी 300 लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी रास्ता रोको आंदोलन केले, बांधकाम विभागाच्या कार्यालयापुढे आमरण उपोषण केले लोकसभेच्या प्रचाराला आलेल्या उमेदवारांच्या गाड्या अडवल्या पण कुठल्या तालुक्यातील पुढाऱ्यांनी दखल घेतली नाही मात्र या विद्यार्थ्यांची हाक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐकून या रस्त्यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर केला व आज या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
करमाळा हिवरवाडी रस्त्याचे आज भूमिपूजन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे,भोसे चे माजी सरपंच भोजराज सुरवसे,हिवरवाडीचे सरपंच दत्तू इरकर माजी सरपंच ज्ञानदेव इरकर बाळासाहेब पवार चतुर्भुजी इरकर, बाळासाहेब सुरवसे, विलास रोडगे,रघुनाथ काळे,गणेश इवरे, ज्ञानदेव इवरे, नंदू इरकर,शिवसेना शाखाप्रमुख आजिनाथ इरकर
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत हिवरवाडी चे ग्रामपंचायत सदस्य जयराज चिवटे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ यांनी केले
करमाळा-हिवरवाडी हा रस्ता स्व. दिगंबरराव बागल यांच्या कार्यकाळात सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर याची डागडुजी केली गेली नाही. करमाळा-हिवरवाडीच्या खराब रस्त्याचा फटका हिवरवाडी,भोसे वडगाव (दक्षिण) या तिन्ही गावातील नागरिकांना होत आहे. या तिन्ही गावांतून सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षणासाठी करमाळा शहरात येतात. तिन्ही गावांतील नागरिकांनी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सदर रस्त्यासाठी तिन्ही गावांतील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. शासनाकडून निधी मिळवून देण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले होते. परंतु निधी कधी मिळणार याची शाश्वती नसल्याने लोकवर्गणीतून ह्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले.
मध्यंतरी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे स्वतःच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या फंडातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याला 50 लाख रुपये मंजूर करून घेतले. नंतर लोकसभेच्या आचारसंहितेचे काम अडकले होते. त्यानंतर आज या कामाचा शुभारंभ चिवटे यांच्याच हस्ते होत आहे.
यावेळी बोलताना रमेश कांबळे म्हणाले की
या रस्त्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलने केली मात्र आम्हाला कोणत्याही नेते मंडळींनी न्याय दिला नाही मात्र आज जिल्हा नियोजन मंडळातून महेश चिवटे यांनी तब्बल पन्नास लाखाचा निधी देऊन हा रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे याबद्दल हिवरवाडी भोसे वडगाव या परिसरातील ग्रामस्थ शिवसेनेचे आभारी आहे.
या रस्त्याचा शेवटचा भाग पूर्ण करण्यासाठी अजून 30 लाख रुपयांचा निधी गरज असून हा निधी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावा त्यासाठी जिल्हाप्रमुख शिवसेने प्रयत्न करावे अशी मागणी भोसे गावचे माजी सरपंच भोजराज सुरवसे यांनी केले.
गावाला रस्ता नसल्यामुळे एसटी येत नव्हती. आता रस्ता होणार असल्याने आमच्या गावाला एसटी सुरू व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल त्यासाठी चिवटे यांनी प्रयत्न करावे अशी मागणी रघुनाथ काळे यांनी केली.