सकल मराठा समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

करमाळा (दि.२४) – करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सर्व मागण्या आपण स्वतः लक्ष देऊन पूर्ण करून घ्याव्यात अशी विनंती यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री पवार यांना केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज करमाळा तालुक्याचा दौरा केला त्या दरम्यान हे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार संजयमामा शिंदे व खासदार सुनील तटकरे हे यावेळी उपस्थित होते. तसेच सकल मराठा करमाळा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .







