आदर्श संगीत विद्यालय पुरस्कार प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना प्रदान…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील लोकनेते स्व. दिगंबरराव बागल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा यांच्यावतीने यावर्षीचा आदर्श संगीत विद्यालय पुरस्कार २०२४ हा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री सतीश कांबळे म्हणाले की करमाळ्यातील सुरताल संगीत विद्यालय हे गेली 27 वर्षा पासून कार्यरत आहे. विद्यालयाचा दर्जा हा खूपच चढता असून आयएसओ मानांकन असलेले संगीत विद्यालय आहे. सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र राज्याची ही या विद्यालयाला मान्यता असून तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना संगीत विषयाच्या गुणासाठी या विद्यालयाचा खूपच मोठा फायदा होत आहे.
आज राज्यभर सुरताल संगीत विद्यालयाचे नाव झालेले असून, यामध्ये प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचे तालुक्यासाठी फार मोठे योगदान आहे आहे. म्हणूनच लोकनेते स्व.दिगंबरराव बागल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था करमाळा यांच्यावतीने देण्यात येणारा आदर्श संगीत विद्यालय पुरस्कार हा प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना देण्यात आला आहे असे ते म्हणाले… यावेळी वाय चेअरमन विकास काळे सचिव संतोष पोतदार संचालक अशोक बर्डे, बाळासाहेब देशमाने, व शिक्षक शिक्षिका वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. योग शिक्षिका रेश्मा जाधव, संध्या थोरे, थोरे सर, प्रदीप नलावडे, शिवलिंग कराळे एडवोकेट सुनील जोशी साहेब, महेश थोरे, विलास भोरे, सुहास कांबळे, बाळासाहेब महाजन, सतीश वीर, नवनाथ थोरात इतर मान्यवरांच्या हस्तेही यावेळी सत्कार करण्यात आला.

