नूतन तहसील कार्यालयाची जागा गैरसोयीची; बहुजन संघर्ष सेना करणार निदर्शने - Saptahik Sandesh

नूतन तहसील कार्यालयाची जागा गैरसोयीची; बहुजन संघर्ष सेना करणार निदर्शने

केम (संजय जाधव) –  नूतन तहसील कार्यालयाची जागा करमाळा शहराबाहेर निश्चित केली असून लोकांना गैरसोयीची आहे त्यामुळे याचा निषेध म्हणून उद्या ४ ऑक्टोबर रोजी करमाळा तहसील कार्यालया समोर बहुजन संघर्ष सेना भव्य निदर्शने करणार असल्याची माहिती बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी माध्यमांना दिली. तशा प्रकारचे निवेदन त्यांनी  तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंग्रजांनी तहसील कचेरी बांधत असताना तहसील कचेरीच्या अवतीभवती भरपूर जागा शिल्लक ठेवलेली आहे तहसील कचेरीच्या शेजारीच पोलीस स्टेशन, पंचायत समिती, संस्था निबंधकाची कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय ही सर्व कार्यालय असून देखील भरपूर जागा शिल्लक आहे मग हसील कार्यालय मौलाली माळावरती बांधण्याचा निर्णय कशासाठी घेतला?  हा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडलेला आहे.

आज असणाऱ्या तहसील कार्यालयापासून एसटी स्टँड जवळ आहे, करमाळा शहराची बाजारपेठ जवळ आहे, त्यामुळे करमाळा शहराचे दळणवळण वाढते शहरातील व तालुक्यातील सर्व लोकांच्या सोयीचे तहसील कार्यालय आहे हे तहसील कार्यालय मौलाली माळावरती बांधण्यात येऊ नये मौलाली माळावरती तहसील कार्यालय बांधल्यास बाजारपेठेवरती परिणाम होणार आहे. शिवाय मौलाली माळावरती नॅशनल हायवे रोड असल्यामुळे खेड्यातील लोकांचे अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय एसटी स्टँड पासून जास्त अंतरावरती पडणार असल्याने लोकांच्या गैरसोयीचे होणार आहे त्यामुळे मौलाली माळावरती तहसील कार्यालय बांधण्यास बहुजन संघर्ष सेनेचा विरोध आहे विरोध दर्शविण्यासाठी तालुक्यातील जनतेने दिनांक ४ ऑक्टोबर रोजी शुक्रवार ठीक सकाळी ११:०० वाजता तहसील कार्यालयासमोर उपस्थित राहून निदर्शन करणार असल्याचे निवेदन म्हटले आहे.

या आंदोलनाला सर्व जनतेने पाठिंबा द्यावा असे आव्हान बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे. यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष अंगद लांडगे,तालुका सचिव कालिदास कांबळे, सोगाव चे सरपंच विनोद सरडे, वरकटनेचे सरपंच गणेश घोरपडे, सुनील आबा पोळ, संजय तनपुरे, विकास कांबळे, मनोज कांबळे, उत्तम गायकवाड, आधी जण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!