मुख्याध्यापिका सुनंदा जाधव यांना राज्य आदर्श सक्षम पुरस्काराने सन्मानित

करमाळा (दि.६) – करमाळा नगरपरिषद शाळा क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा सुरेश जाधव यांना राज्य आदर्श सक्षम पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे. सदरच्या पुरस्काराकरिता महाराष्ट्रातून राज्य शासनाने अनेक सक्षम महिलांची शिफारस करण्यात आलेली होती. त्यातून राज्यातून फक्त आठ महिलांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात मुख्याध्यापका सौ सुनंदा जाधव यापैकी एक आहेत.
सौ. जाधव यांनी आपल्या शाळेतील अध्यापन कौशल्य पद्धती व शाळेला व विद्यार्थ्यांना लावलेल्या शिस्तीच्या जोरावर करमाळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. नगर परिषदेची शाळा असूनही प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे स्वतः लक्ष देणे, वेळोवेळी पालक मीटिंग घेऊन पालकांना मार्गदर्शन करणे, तसेच शाळेची इमारत व परिसर वृक्षारोपण करून सुशोभित करणे यामुळे नगरपरिषद शाळा क्रमांक 1 ही सध्या करमाळा शहरातील अग्रगण्य शाळा गनली जात असून त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा सुरेश जाधव यांना राज्य शासनाचे या अगोदरही जाधव यांना अनेक पुरस्कार मिळालेले असून त्यात या पुरस्काराने भर घातलेली आहे.

या पुरस्काराबद्दल करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ दलित सेनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले बामसेफचे अरुण माने व मंडळ अधिकारी श्री घुगे यांनी त्यांचा सत्कार केला.
सौ सुनंदा जाधव यांचा जीवन प्रवास हा नेहमीच आम्हाला प्रेरणादायी राहिला असून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जाधव मॅडम यांनी अहोरात्र परिश्रम करीत आहेत. खरंतर त्यांची शाळेबद्दल व विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल आस्था व तळमळ पाहून त्यांना राज्य शासनाने “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित करायला पाहिजे होते. या सन्मानाबद्दल नागेश दादा मित्र मंडळ यांच्या
- लक्ष्मणराव भोसले, करमाळा





