झरे सोसायटीच्या व्हा.चेअरमनपदी राजेंद्र मावलकर यांची बिनविरोध निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : झरे वि.का.स.सोसा.च्या व्हा.चेअरमन पदी राजेंद्र साहेबराव मावलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी झरे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी झरे गावचे नेते नारायण शेठ अम्रुळे, अर्जुन गुळवे, खंडू काळे, बन्सी घाडगे, किसन घाडगे, बापू कदम, महादेव कोकाटे, प्रशांत चौधरी सतीश गवळी, महादेव मावलकर तसेच युवा नेते विकास शेठ अम्रुळे व झरे गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवा वर्ग उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवडीबद्दल स्वागत ॲड.विनोद चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश गवळी यांनी केले.






