करमाळ्यात गरबा महोत्सव उत्साहात साजरा - किडनी देऊन पतीचे प्राण वाचवणाऱ्या महिलांचा केला गेला सन्मान - Saptahik Sandesh

करमाळ्यात गरबा महोत्सव उत्साहात साजरा – किडनी देऊन पतीचे प्राण वाचवणाऱ्या महिलांचा केला गेला सन्मान

करमाळा (दि.११) : शिवसेनेच्या वतीने करमाळा येथे ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान धर्मवीर आनंद दिघे फेस्टिव्हल अंतर्गत गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. ८ ऑक्टोबर रोजी स्वतःची किडनी देऊन पतीचे प्राण वाचवणाऱ्या महिलांचा व देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला.

९ ऑक्टोबर रोजी करमाळा तालुक्यात 70 हजार लाडक्या बहिणींची अर्ज मोफत भरून देऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अंगणवाडी सेविका यांचा सन्मान करण्यात आला तर १० ऑक्टोबर रोजी पतीच्या निधनानंतर  सक्षमपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करून मुलांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला.  हा सत्कार करमाळ्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आला.

हा कार्यक्रम करमाळा येथील श्रीदेवीचा माळ रोड वरील पेट्रोल पंपा समोर आयोजित करण्यात आला होता सायंकाळी सहा ते दहा दरम्यान सत्कार गरबा डान्स आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास करमाळा शहर व परिसरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

यावेळी बोलताना तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या की खऱ्या अर्थाने धर्माचे पालन करून स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या महिलांचा सत्कार नवरात्र उत्सवानिमित्त करून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे यामुळे खऱ्या अर्थाने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

स्वतःची किडनी घेऊन पतीचे प्राण वाचवणाऱ्या महिलांचा सत्कार करत असताना या महिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. स्वतःच्या पतीसाठी किडनी देणाऱ्या स्मिता मसलेकर यांनी यावेळी सांगितले की आज माझा केलेला सत्कार खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक करणारा आहे. अशाच पद्धतीने समाजात आदर्श असणाऱ्या महिलांचा सत्कार शिवसेनेने करून महिलांच्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावी असे आवाहन केले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा समन्वयक पद्मजा इंगोले शहर प्रमुख कीर्ती स्वामी,उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील,शहर प्रमुख संजय शीलवंत,युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, उपतालुकाप्रमुख डॉ. गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, सुनील शिंदे, शिवसेना ओबीसी आघाडी तालुकाप्रमुख अंकुशराव जाधव,ओबीसी आघाडी जिल्हाप्रमुख सुरेश करचे,शाखाप्रमुख निलेश चव्हाण,नागेश शेंडगे,डॉक्टर करंजकर आदी जण उपस्थित होते.

शिवसेना गरबा महोत्सवात महिलांनी लुटला टिपऱ्याचा आनंद

गरबा उत्सवाचा महिलांनी लुटला आनंद

८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी ७ ते १० दरम्यान गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे महिला जिल्हा समन्वयक पद्मजा इंगवले करमाळा महिला शहर प्रमुख कीर्ती स्वामी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील शहरप्रमुख संजय शीलवंत यांच्या पुढाकाराने श्री कमला भवानी नवरात्र उत्सवानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करमाळा शहरात करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या उत्सवासाठी पुणे येथून साऊंड सिस्टिम व गायक कलाकार मागवण्यात आले आहेत

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँकर संदीप पाटील पुणे,रील स्टार निलेश भुसारे,अभिनेत्री दीक्षा शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन एस के इव्हेंट अँड मॅनेजमेंट करमाळा यांनी केले. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या गाण्यावर दांडिया रास चांगलाच गाजला. या कार्यक्रमात कोणत्याही पुरुषाला एन्ट्री नसल्यामुळे महिलांना मुक्त वातावरणात या गरबा उत्सवाचा आनंद घेता आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वतःच्या पतीसाठी आपली किडनी देऊन नवऱ्याचे प्राण वाचवणाऱ्या स्मिता मसलेकर यांच्या हस्ते करण्यात आले.पुढील वर्षी नामांकित अभिनेत्रींना आमंत्रित करून करमाळा तालुक्यातील महिलांना गरबा उत्सवाचा आनंद देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने यापेक्षाही मोठे कार्यक्रम आयोजित केले जातील असा विश्वास यावेळी आपल्या मनोगत आतून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला.

पुढे बोलताना जिल्हाप्रमुख चिवटे म्हणाले की, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने अडीच वर्षात महिलांना मजबूत व सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणलेल्या आहेत यामुळे आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तमाम महिलांचा एकनाथ शिंदे भाऊ झालेला आहे. या भावाचे हात मजबूत करून पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यातील महिलांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी बहिण म्हणून उभे राहावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!