मराठा सेवा संघाच्या वतीने विविध सामाजिक कार्य करणाऱ्या ६०+ व्यक्तींना पुरस्कार प्रदान - Saptahik Sandesh

मराठा सेवा संघाच्या वतीने विविध सामाजिक कार्य करणाऱ्या ६०+ व्यक्तींना पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.१६) –   मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन करमाळा येथील यश कल्याणीभवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मराठा मार्गदर्शक सन्मान पुरस्कार, मराठा मित्र पुरस्कार, मराठा भूषण पुरस्कार, विशेष सामाजिक गुणगौरव पुरस्कार, उत्कृष्ट अंगणवाडी सेवा पुरस्कार, मराठा रणरागिणी पुरस्कार आदींच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. सर्व सत्कारमूर्तींना मानाची शाल स्मृतिचिन्ह व शिवचरित्राची भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन आणि जिजाऊ वंदनेने झाली. भिमराव लोंढे यांनी महापुरुष गीत गाऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तम माने होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये किरण घाडगे, बाळासाहेब बागल, मनोज राऊत, गणेश करे-पाटील, विलासराव घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दशरथआण्णा कांबळे, ड. सविता शिंदे, गणेश करे-पाटील, किरणराज घाडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

करमाळा तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुढील पुरस्कार देण्यात आले. 

  • मराठा भूषण पुरस्कार – संजय घोलप, विजय लावंड,, तहसीलदार विजय तळेकर, भरत अवताडे,राजू फडके,मनोज राऊत,नानासाहेब मोरे,संदीप पवार,मनोज राखुंडे, ऍड. कमलाकर वीर, ईश्वर भांडवलकर,पै.संजूभैय्या गायकवाड,दशरथ घाडगे,धीरज रोकडे, ऍड. सविताताई शिंदे,प्रा.दिलीप जगताप,अतुल फंड,बाळासाहेब गोरे, संतोष पाटील, डॉ.अमोल दुरंदे,
  • मराठा मित्र पुरस्कार – श्रेणीकशेठ खाटेर, कन्हैय्यालाल देवी, अल्ताफ तांबोळी, तानाजी जाधव, शिवाजीराव बंडगर, जमीर सय्यद,राजाभाऊ कदम, यशपाल कांबळे,सुनील भोसले,नारायण पवार,युवराज जगताप, विष्णु परदेशी,दादासाहेब कोकरे,राजू आव्हाड, नागनाथ केकान,प्रा.गणेश करे-पाटील,कृष्णा गहिवले, अहमदचाचा कुरेशी,अशोक पवार,कंदरचे सरपंच मौला मुलाणी,अफसर जाधव, दुर्गेश राठोड,बालाजी अंधारे,शेखर गाडे,उमेश निमगिरे
  • विशेष गुणगौरव पुरस्कार – विनय ननवरे, साहेबराव वाघमारे, बापूसाहेब रंदवे
  • मराठा सेवा संघ मार्गदर्शक पुरस्कार –  दशरथ कांबळे
  • सामाजिक गुण गौरव पुरस्कार  – कै. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठान, करमाळा, नागनाथ लेझीम संघ ग्रामस्थ शेटफळ, छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थान, (गड किल्ले संवर्धन, इतिहास प्रबोधन कार्य), मराठा फॉर्ट्स दुर्गभ्रमंती व दुर्गजागर (गड किल्ले संवर्धन, इतिहास प्रबोधन कार्य),   रिटेवाडी ग्रामस्थ, मांजरगाव ग्रामस्थ, आंबेडकरवादी चळवळ,करमाळा
  • उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार – माया काळे
  • मराठा रणरागिणी पुरस्कार – शोभा गुट्टे, नलिनी संजय जाधव,स्वाती माने-फंड,जि. प. सदस्य राणी संतोष वारे,जान्हवी राहुल सावंत
  • विशेष सन्मान – सचिन काळे

अध्यक्षीय भाषणात उत्तम माने यांनी करमाळा तालुका मराठा सेवा संघाच्या कार्याचे कौतुक करत सचिन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्यांना सन्मानित करणे ही संघटनेची उल्लेखनीय परंपरा आहे. विशेषतः मराठा मित्र पुरस्कार आणि मार्गदर्शक सन्मान पुरस्कार यांचा उल्लेख करत माने यांनी संघटनेच्या कार्याला पुढेही असाच पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सचिन काळे यांनी केले. त्यांनी मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमाला सर्व राजकीय गट आणि सामाजिक संघटनांच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच मराठा सेवा संघाला अशाच प्रकारे पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी करमाळा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड तसेच डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!