पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करणार – जितेश कटारिया
करमाळा (दि.१९) करमाळा विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे करमाळा विधानसभेसाठी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचे काम पक्षातील सर्व जुन्या आणि नवीन सहकार्यांना सोबत घेऊन करणार असल्याची भावना भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस जितेश कटारिया यांनी व्यक्त केली
येत्या काही दिवसामध्ये करमाळा विधानसभा महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होवू शकते. येत्या २० ऑक्टोबरला भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. जनतेने 2014 – 2019 चा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र मध्ये भाजपला निर्णायक आघाडी दिली होती.आता होणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये ही जनता महायुतीच्या पाठीशी आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकार ने जनतेच्या हिताच्या अनेक योजना दिल्या. विशेषता लाडकी बहिणी योजनेद्वारे अनेक माता भगिनी महायुती सरकार बद्दल समाधानी आहेत.करमाळा तालुक्यात भाजपाच्या वतीने ज्या उमेदवाराला संधी दिली जाईल, त्या उमेदवाराचे काम पक्षाच्या सर्व जुन्या सहकार्यांना सोबत घेऊन आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस जितेश कटारिया यांनी सांगितले.