मातृ शक्तीचा सन्मान, स्त्रियांना कर्तृत्वाची गगनभरारी घेण्यास प्रेरणादायी – प्रा.करे-पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी : वैद्यकीय सेवा, विधी सेवा, बँकींग व फायनान्स, सरकारी सेवा, प्रसारमाध्यम, व्यवसाय, सहकार, शैक्षणिक,सामाजिक, कला व क्रिडा अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दुर्गांचा नवरात्री उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर ‘सन्मान सोहळा’ २० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

या समारंभाचे प्रमूख पाहुणे व यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, मातृ शक्तीचा सन्मान करणे म्हणजे महिलांना कर्तृत्वाची गगनभरारी घेण्यास प्रेरणादायी आहे. नुकतेच नवरात्री व कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली मात्र यशाची पौर्णिमा साजरी व्हावी या हेतूने दिव्य मराठीने नारी शक्तीचा सन्मान करून महिलांना सहावे सुख देण्याचे कार्य केले आहे. आपली संस्कृती मातृशक्तीचा आदर करणारी असून, समाजाला सर्जनशील विचारांची गरज असून नारी शक्ती हीच समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करत आहे स्त्रियांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत दिव्य मराठीने नारी शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित केला हे कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रिसिजन उद्योग समूहाच्या डॉ सुहासिनी शहा, प्रोलक्स अँण्ड वेलनेसच्या डॉ.प्रचिती पुंडे , यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, विनयग् रुपचे चंद्रशेखर अक्कलकोटे नितीन फलटणकर, युनिट हेड नौशाद शेख या मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रिसिजन समूहाच्या डॉ. सुहासिनी शहा यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.सुनिता देवी, डॉ. सरिता विटूकडे, प्रा. रेखा शिंदे-साळुंके, प्रा. ज्योती मुथा यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.




