शेतकऱ्यांनी एक तरी देशी गाय सांभाळावी – डॉ. श्रीराम परदेशी
करमाळा (दि.२९) – देशी गाईंचे संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक तरी देशी गाय सांभाळावी असे मत करमाळा येथील डॉ. श्रीराम परदेशी यांनी व्यक्त केले. करमाळा येथील श्री पांजरपोळ गोरक्षण संस्था येथे वसुबारस कार्यक्रमानिमित्त गाईंचे पूजन कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की “दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी” असे सूर आपणास पुुर्वा ग्रामीण भागात गुणगुणताना आपण पाहत होतो परंतु आज शहरीकरणामुळे सणाचे स्वरूप बदलत चालले आहे. वसुबारस च्या रूपाने गाईंचे संवर्धन करण्याचा मंत्र आपल्याला पूर्वजांनी दिला आहे परंतु आज देशी गायीकडे दुर्लक्ष करीत आहोत. देशी गाई मध्ये अनेक गुुण सामावलेले आहेत त्यामुळे प्रत्येक कुटुंबांनी, शेतकऱ्यांनी एक तरी देशी गाय सांभाळावी श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की पुढील वर्षी वसुबारस हा उपक्रम नवीन शेडमध्ये होत आहे असे मत व्यक्त केले
यावेळी श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष भरतकुमार गांधी सचिव सुयश दोशी,माजी नगरसेवक संजय सावंत, राधेश्याम देवी अशोक दोशी मुकुंद जव्हेरी विजयकुमार दोशी अमित दोशी,नरेंद्रसिंह ठाकुर शिवनाथ घोलप अब्रार पठाण फारूक जमादार महेश परदेशी अर्चना गांधी अमृता गांधी प्राची दोशी पत्रकार डी जी पाखरे वंदना मोरे नानासाहेब मोरे शेटफळ आदी जण उपस्थित होते.