करमाळा विधानसभा मतदार संघात ३५ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल – उद्या छाननीनंतर उमेदवार निश्चित होणार
करमाळा (दि.२९) – करमाळा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (ता.२९) १२ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले आहेत. आत्तापर्यंत ३५ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारी अर्जाची छाननी उद्या (ता.३०) सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांचे उपस्थितीत होणार आहे.
या निवडणुकीत आत्तापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नारायण आबा पाटील, अपक्ष विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, महायुतीकडून दिग्विजय बागल (शिवसेना), सागर राजाराम लोकरे (मनसे), विकास शिवाजी अलदर (रासप), संजय वामन शिंदे (बसपा) यासह अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दाखल केलेल्या अर्जात संजय शिंदे नावाचे जास्त उमेदवार आहेत.
करमाळा विधानसभेसाठी नामांकन पत्र दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे
- कल्याण चंद्रसेन खाटमोडे (दिवेगव्हाण – अपक्ष)
- प्रताप नामदेवराव जगताप (करमाळा – अपक्ष)
- संजय वामन शिंदे (दहिगाव – बसपा)
- अभिमन्यु किसन अवचर (मांगी, अपक्ष)
- संजय लिंबराज शिंदे (खांबेवाडी, अपक्ष)
- दत्तात्रय पांडूरंग शिंदे (उमरड, अपक्ष)
- नारायण गोविंदराव पाटील (जेऊर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट)
- संजय विठ्ठलराव शिंदे, (निमगाव, अपक्ष)
- रामदास मधुकर झोळ, (वाशिंबे, अपक्ष)
- माया रामदास झोळ (वाशिंबे, अपक्ष)
- विकास शिवाजी अलदार (चोभेपिंपरी, अपक्ष)
- दिग्विजय दिगंबरराव बागल (करमाळा, शिवसेना)
- सागर राजाराम लोकरे (पिंपळखुंटे, मनसे)
- सिध्दांत सदाशिव वाघमारे (भिमनगर करमाळा, अपक्ष)
- निवृत्ती पोपट पाटील (बारलोणी, अपक्ष)
- संभाजी अर्जुन भोसले (जिंती, अपक्ष)
- उदयसिंग निळकंठराव देशमुख (वांगी नं. १, अपक्ष)
- जितेंद्र युवराज गायकवाड (कुर्डुवाडी, अपक्ष)
- संजय विठ्ठल शिंदे (चिंचगाव, अपक्ष)
- संभाजी भानुदास उबाळे (म्हैसगाव, अपक्ष)
- धिरज माणिक कोळेकर (कुर्डुवाडी, अपक्ष)
- यशवंत संजयमामा शिंदे (निमगाव ह, अपक्ष)
- शहाजान पैगंबर शेख (कुर्डुवाडी, बहुजन महा पार्टी)
- गणेश हनुमंत घुगे (कुर्डुवाडी, रिपाइं)
- रामदास मधुकर झोळ (वाशिंबे,अपक्ष)
- मधुकर गणपत मिसाळ (बाळेवाडी, बहुजन मुक्ती पार्टी)
- भानवसे गणेश अभिमान (वांगी नं. २, अपक्ष)
- विनोद दिलीप सितापुरे (करमाळा, अपक्ष)
- ॲड.महादेव औदुंबर कदम (कंदर, बसपा)
- जालिंदर वाल्मिक कांबळे (पोफळज, अपक्ष)
- ॲड.मोहम्मद जमीर कलिंदर शेख ( जिंती, अपक्ष)
- सुहास शिवमुर्ती ओहोळ (करमाळा, अपक्ष)
- डॉ. सुजित काशिनाथ शिंदे (करमाळा, अपक्ष)
- अतुल भैरवनाथ खुपसे (उपळवटे, अपक्ष)
- बाळासाहेब मच्छिंद्र वळेकर (निंभोरे, अपक्ष)
- अशोक ज्ञानदेव वाघमाडे (निलज, न्यु. राष्ट्रीय समाज पार्टी)
उमेदवारांची छायाचित्रासहीत नावे –





- तालुक्याच्या राजकारणात रंगत – जगतापांचा संजयमामा ऐवजी नारायण आबांना पाठींबा
- दिग्विजय यांच्या हाती धनुष्यबाण! झोळ बनले जरांगेंचे शिलेदार, आमदार शिंदेसह प्रमुख दावेदार रिंगणात




