सामाजिक उपक्रम राबवित कुमार माने यांचा वाढदिवस साजरा

करमाळा (दि.४) – युवा सेनेचे करमाळा तालुका समन्वयक कुमार माने यांच्या 2 नोव्हेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेतील निराधार वृद्धांना मोफत जेवण व गुरू दिव्यरत्न गोपालन संस्था करमाळा येथे गुरांना चारावाटप करण्यात आले.
कुमार माने यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी माने म्हणाले की निराधार वृद्धांना मोफत जेवण देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद मला दिसला. दरवर्षी आपण वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम करतो याचा मला आनंद आहे.कुमार माने यांनी साजरा केलेला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपणारा आहे.
यावेळी सुहास माने,अजय साने,श्याम घाडगे,सौरभ माने,अविनाश घाडगे,रोहन माने,किशोर पवार,राहुल लिमकर,वैभव साने, राजू परदेशी, सुरज होनप, राहुल घाडगे. व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.





