केम येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन – प्रसिध्द युवा किर्तनकरांचे कीर्तन आयोजित

केम (संजय जाधव) – भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त केम येथील भैरवनाथ मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त मंदिरात नित्यनेम धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती संयोजक कुंडलिक तळेकर यांनी दिली.
या मध्ये सकाळी ८ वा. श्रीस अभिषेक रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तन ९ वा महाप्रसाद, बुधवार दि २० नोव्हेंबर ह.भ.प. गणेश भोरे कालेंकर यांचे रात्री ७ ते ९ कीर्तन, गुरुवार दि २१ रोजी ह.भ.प. सुधीर महाराज वालवडकर (गीत रामाणाचार्य) कीर्तन ७ ते ९, शुक्रवार दि.२२ रोजी ह.भ.प. शुभम महाराज वसंतगडकर (झी.टाॅकिज फेम) रात्री ७ ते ९ कीर्तन
शनिवार दि.२३ भैरवनाथ जन्माचे कीर्तन ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई घाडगे (झी.टाॅकिज फेम ) रात्री १० ते १२ या वेळेत होईल बरोबर १२ वा.५ मी.भैरवनाथ जन्म झाल्यावर पुष्प वृष्टी करण्यात येईल. रविवार दि.२४ रोजी काल्याचे कीर्तन ह.भ.प लालासाहेब चोपडे महाराज सकाळी १० ते १२ वेळेत होईल त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
या सप्ताहात मृदांगाचार्य अॅड. कृष्णा महाराज गायनाचार्य तात्या हजारे महाराज तसेच कीर्तनाला साथ देणारे केम व परिसरातील भजनीमंडळ उपस्थित राहणार आहेत. तरी केम व परिसरातील भाविकांनी याचा लाभ ध्यावा असे आवाहान संयोजकांनी केले आहे. या सप्ताहासाठी भैरवनाथ भक्त परिश्रम घेत आहेत.




