करमाळा तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या हक्काच्या माणसाला निवडून आणा – रश्मी बागल

केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या हक्काच्या माणसाला निवडून आणा असे आवाहन भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी केम येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात व्यक्त केले. केम येथील विठ्ठल मंदिरामध्ये काल (दि.१४) हा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
करमाळा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना – महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या प्रचारार्थ केम येथे महिला मेळावा आयोजित केला होता.
रश्मी बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
पुढे बोलताना रश्मी बागल म्हणाल्या की, महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला विरोधक बंद करण्यासाठी कोर्टात गेले. परंतू ही योजना कदापि बंद होणार नाही आणि पुढील पाच वर्षे ही योजना सरकार यशस्वीरित्या राबविणार आहे. आपल्या एकतेत सशक्त महाराष्ट्र घडविण्याची ताकद आहे आणि ती आपण आपल्या मताद्वारे दाखवण्याची वेळ आता आली आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला केम परिसरातील अनेक महिलांनी उपस्थिती दर्शवली होती.






