उच्च न्यायालय व खंडपीठाची दोन दिवसीय लोकअदालत : पक्षकारांना सहभागी होण्याचे आवाहन…
करमाळा (दि.२०)- उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद व नागपुर खंडपीठ येथे येत्या ३० नोव्हेंबर डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतमध्ये पक्षकारांना आपली प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष लोकआदलत मध्ये मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद व नागपूर खंडपीठ येथे प्रलंबित आसलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. सोलापूर जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे या ठिकाणी प्रलंबीत आहेत व ती तडजोडीने मिटविण्याची ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोकआदलतमध्ये ठेवता येउ शकतात.
या विशेष लोकआदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष व अभासी पध्दतीने सहभागी होउ शकतात, सोलापूर शहर व जिल्हयातील प्रकरणे उच्च न्यायालयाच्या विशेष लोकआदलतीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकाराने संबधित वकीलांना कल्पना द्यावी, किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर किंवा तालुका विधी सेवा समिती, करमाळा यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा करमाळा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सौ.एम.पी.एखे यांनी केले आहे.