अतिक्रमणाची पाहणी करत असताना शासकीय कामकाजात अडथळा आणल्याबद्दल चौघांविरोधात गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

अतिक्रमणाची पाहणी करत असताना शासकीय कामकाजात अडथळा आणल्याबद्दल चौघांविरोधात गुन्हा दाखल

करमाळा (दि.६) – अतिक्रमणाची पाहणी करत असताना शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल चौघांविरोधात करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी करमाळा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 4 डिसेंबर रोजी दुपारी १ च्या  सुमारास मी व सोबत करमाळा नगरपरिषद येथे नेमणुकीस असलेले शशांक भोसले नगररचना सहायक असे मिळून देवीचामाळ ते भवानी नाका दरम्यान करमाळा नगरपरिषदेच्या हद्दीतील गट नं.216 मध्ये बार्शीच्या न्यायालयाने स्टे ऑर्डर दिलेली होती. म्हणून आम्ही सदर जागेवर कोणी अतिक्रमण केले आहे काय याबाबत पाहणी करीत असताना सदर जागेवर बुवा धनवे, सचिन गायकवाड, अजय खंडागळे व शेखर हेरकर यांनी पत्राशेड मारून अतिक्रमण केलेले दिसत होते

त्यावेळेस मी त्याठिकाणी असणारे बुवा धनवे, सचिन गायकवाड, अजय खंडागळे व शेखर हेरकर यांना आपण मा.न्यायालयाने स्टे ऑर्डर दिलेल्या जागेत अतिक्रमण केलेले आहे. आपणांला ते काढावे लागेल असे मी त्यांना सांगत असताना त्यांनी मला प्रतिबंध करून शासकीय कामकाजात अडथळा आणला आहे. अशी तक्रार मुख्याधिकारी यांनी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!