केम येथे जेऊर बीटस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न - Saptahik Sandesh

केम येथे जेऊर बीटस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न

केम(संजय जाधव) –  जेऊर बीटस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालय येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा केम, कंदर, वांगी ,जेऊर व चिखलठाण या केंद्रांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे उद्घाटन करमाळा तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व कबड्डी खेळाच्या ग्राउंड चे उद्घाटन करून झाले. यावेळेस केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे. कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर,वांगी केंद्राचे केंद्रप्रमुख सतीश शिंदे,जेऊर केंद्राचे केंद्रप्रमुख बापू भंडारे व  चिखलठाण केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ वंदना पांडव  या उपस्थित होत्या. त्याच बरोबर जेऊरबीट मधील स्पर्धेसाठी आलेले सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या.

स्पर्धा पंच म्हणून बीट मधील शिक्षकांनी उत्तम कामगिरी पार पाडली. स्पर्धेच्या शेवटी विजेत्या व उपविजेत्या संघांना प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज तळेकर,शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर , श्री रामचंद्र तळेकर,श्याम तळेकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!