करमाळा येथील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 251 प्रकरणे निकाली - 7 कोटींपेक्षा जास्त रक्कम वसुली.. - Saptahik Sandesh

करमाळा येथील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 251 प्रकरणे निकाली – 7 कोटींपेक्षा जास्त रक्कम वसुली..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साेा तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर एम.एस.आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यु.पी.देवर्षी व तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा एम.पी.एखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती करमाळा व तालुका वकील संघ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ डिसेंबर रोजी ” राष्ट्रीय लोकअदालत ” याचे आयोजन न्यायालयात करण्यात आले होते, यामध्ये 251 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

यावेळी एम.पी.एखे मॅडम, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर करमाळा व एस.पी.कुलकर्णी मॅडम सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर, करमाळा तसेच ॲड.आर.ए.बरडे अध्यक्ष बार असोसिएशन करमाळा व उपाध्यक्ष ॲड.एस.ए.रोकडे व इतर विधीज्ञ हे उपस्थित होते.

यावेळी दोन पॅनल करण्यात आले होते. सदर दाखल प्रकरणात एकूण 1833 प्रकरणे ठेवलेली होती, त्यातील 251 प्रकरणे निकाली करण्यात आली. त्याची रक्कम रुपये 7,05,59,904/- वसुली करण्यात आली. दाखल पूर्व प्रकरणे 3684 ठेवलेली असून त्यातील 186 प्रकरणे निकाली करण्यात आली. यामध्ये रक्कम रुपये 32,21,233/- वसुली करण्यात आली. यामध्ये एकूण संपूर्ण निकाली प्रकरणे 5517 पैकी 437 प्रकरणे निकाली करण्यात आली. यामध्ये एकूण रक्कम रुपये 7,37,81,137/- वसुली करण्यात आली. याप्रसंगी करमाळा वकील संघाचे सर्व सद्स्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!