करमाळा तालुका संगणक परिचालक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रताप देवकर तर उपाध्यक्षपदी अमोल सोरटे – कार्यकारिणी जाहीर…
करमाळा / संदेश प्रतिनिधी : पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या करमाळा तालुका संघटनेची बैठक करमाळा येथील दत्त मंदिर येथे काल ता.१६ रोजी आयोजित करण्यात आली होती, सदरील बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी हनुमंत नलवडे हे होते.
यावेळी बैठकीच्या प्रस्ताविकेत संघटनेचे मार्गदर्शक तत्वे,ध्येय,धोरणे मांडली.तसेच बैठकीत सर्वानुमते करमाळा तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्षपदी प्रताप देवकर , उपाध्यक्षपदी अमोल सोरटे तर सचिवपदी श्रीकृष्ण कोठावळे, कार्याध्यक्षपदी नंदकुमार नाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून अध्यक्ष प्रताप देवकर यांनी संघटनेचे नियम अटी पळून पुढील काळात सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
उर्वरित तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे…. प्रताप देवकर अध्यक्ष,अमोल सोरटे उपाध्यक्ष,श्रीकृष्ण कोठावळे सचिव, नंदकुमार नाळे कार्याध्यक्ष, सचिन खटके सहसचिव,वैशाली शिंगटे खजिनदार, सुनिल सावंत संपर्कप्रमुख, ज्योती चव्हाण प्रसिद्धी प्रमुख,संघटकपदी हनुमंत नलवडे,समाधान मस्कर , रेवननाथ मोरे, दत्तात्रय शिंदे यांची निवड जाहीर केली आहे. सदरील कार्यकारणी बैठकीसाठी सर्व संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.