नवभारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली करमाळा येथील एस व्ही मार्टला भेट
करमाळा (दि.१७) – श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्सची शहरातील एस व्हीं मार्ट ला व्हिजिट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानामध्ये वाढ व्हावी, आपणाजवळ असणारी रक्कम व खरेदी यांचा मेळ कसा लावावा, तसेच पैशांचे व्यवहार मुलांना समजले जावेत यासाठी ही भेट देण्यात आली.
या भेटीने विद्यार्थ्यांना बिलिंग, एडिशन, मल्टिप्लिकेशन या गणितीय परिभाषांचे प्रॅक्टिकल नॉलेज मिळन्यासही खूप मदत झाली. स्वतः खरेदी केल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून भरभरून दिसून येत होता. विशेष म्हणजे शाळेच्या सर्वेसर्वा सौ सुनीता देवी याही त्यांच्यासोबत होत्या तसेच त्यांनी मुलांना खाऊही दिला. त्यामुळे मुलांना एक वेगळाच आनंद मिळाला. भेटीच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अश्विनी क्षीरसागर तसेच शिक्षक वर्ग ही उपस्थित होत्या.