तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिवरवाडी जि. प. शाळेला मिळाली पाच बक्षिसे
करमाळा(दि.१८) – तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिवरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विविध प्रकारच्या स्पर्धेत ५ बक्षिसे मिळाली.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा या केम येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व राजाभाऊ तळेकर विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यावेळी कबड्डी, खो-खो, लंगडी धावणे ई. विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक खेळासाठी शाळेत मुलांचा व मुलींचा असे वेगवेगळे गट तयार करून या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतून हिवरवाडी प्राथमिक शाळेला चार उपविजेतेपद मिळालेले आहेत.
हिवरवाडी प्राथमिक शाळेला पुढील प्रमाणे बक्षिसे मिळाली आहेत –
- 1) कबड्डी मुले -उपविजेता (द्वितीय )
- 2)लंगडी मुले -उपविजेता (द्वितीय )
- 3)कबड्डी मुली -उपविजेता (द्वितीय )
- 4)लंगडी मुली -उपविजेता (द्वितीय )
- 5)100 मीटर धावणे (तृतीय) – श्लोक नानासाहेब पवार
या यशाबद्दल हिवरवाडी शाळेच्या खेळाडूंचे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन व्हटकर क्रीडा शिक्षक नाना वारे, दिपाली गायकवाड, सुषमा काळे यांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी नलवडे, शिक्षण विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले, नितीन कदम, केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ तसेच सरपंच केतन इरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब पवार मेजर आकाश इरकर, क्रीडाप्रेमी ओंकार पवार,प्रकाश लांडगे अमोल पवार व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले