मारकड वस्ती शाळेच्या मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्र

करमाळा (दि.२०) – केम येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारकड वस्ती (केंद्र चिखलठाण) या शाळेतील मुलींचा कबड्डी संघ (लहान वयोगट) जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्र झाला आहे. अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये मारकड वस्तीच्या शाळेने हिवरवाडी शाळेच्या संघावर सहा गुणांनी विजय मिळविला.
करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे विस्तार अधिकारी नितीन कदम मिनीनाथ टकले केंद्रप्रमुख वंदना पांडव, रमाकांत गटकळ, लक्ष्मण भंडारे, चिखलठाण चे सरपंच विकास गलांडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मारकड सर्व पालक यांनी मारकडवस्तीचे मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक तात्यासाहेब जगताप सहशिक्षिका स्वाती जगताप पाटील यांचे आणि सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले




