करमाळा येथे करिअर मार्गदर्शन सेमिनार संपन्न - Saptahik Sandesh

करमाळा येथे करिअर मार्गदर्शन सेमिनार संपन्न

करमाळा (दि.२२) – मोशन अकॅडमी बारामती यांच्यावतीने करमाळा येथे आज रविवार (दि.२२) मोशन टॅलेंट सर्च परीक्षा व करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारला करमाळा शहर व परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

करमाळा येथील चिवटे हॉटेलमध्ये हा सेमिनार घेण्यात आला. या सेमिनारला संदिप पवार व पांडुरंग फुंदे यांनी विद्यार्थ्यांना 10 वी नंतर सायन्स क्षेत्रातील करिअर संधी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.यावेळी शुभम वाघ, समर्थ गायकवाड, व चिवटे हॉटेलचे मालक अक्षय चिवटे इ. मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!