करमाळा शहरात उद्या  २३ डिसेंबरला विठाई मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा - Saptahik Sandesh

करमाळा शहरात उद्या  २३ डिसेंबरला विठाई मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा

करमाळा (दि.२२) : करमाळा शहरात कमलादेवी रोडलगत युनियन बँकेजवळ, शाहुनगर येथे नव्याने सुरू होणाऱ्या विठाई मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा.५५ मि. होणार आहे.  

विठाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल हे करमाळेकरांच्या सेवेत २४ तास उपलब्ध राहणार असून मुंबई येथील डॉ.आर.एन.कॉर्पर हॉस्पिटलमध्ये पूर्वी कार्यरत असलेले सुप्रसिध्द तज्ञ डॉक्टर डॉ. अजयकुमार अनंत तोरड हे रूग्णावर उपचार करणार आहेत.  या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये हृदयरोग, मधुमेह उपचार, मेंदूचे उपचार, हार्टअटॅक, सर्पदंश, विषबाधा, अर्धांगवायू, पोट, तसेच थायरॉईड, दमा, टीबी व फुफ्फुसाचे आजार, किडनी आणि लिव्हर चे आजार, आणि आतड्याचे विकार, कावीळ तसेच डोकेदुखी आणि मेंदूचे विकार, संधिवात तसेच साथीचे आजार मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, टायफाईड आदी आजारांवर अचूक असे उपचार केले जाणार आहेत.

सदरच्या हॉस्पीटलमध्ये १२ बेडचे सुसज्ज आयसीयु, २ डी इको., व्हेंटिलेटर आणि सेंट्रल ऑक्सीजन, एक्स-रे, आपतकालीन विभाग (इमर्जन्सी), ऑपरेशन थिएटर, डिलक्स रूम्स, जनरल वॉर्ड, २४ बाय सात चे मेडिकल, पॅथॉलॉजी लॅब आदी सोयी उपलब्ध आहेत. सदर हॉस्पीटल मध्ये २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे.

करमाळा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. यामध्ये विद्यमान आमदार नारायण आबा पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार संजयमामा शिंदे, मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, , रामदास झोळ, गणेश चिवटे, महेश चिवटे यांच्यासह विविध राजकिय मान्यवर तसेच  तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे मुख्याधिकारी नगरपरिषद नितीन तपसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर आदी प्रशासकीय अधिकारी,  यशकल्यानी सेवाभावी संस्थेचे गणेश करे-पाटील, ज्येष्ठ पत्रकार अ‍ॅड.बाबूराव हिरडे आदी सामाजिक क्षेत्रात काम करणारे विविध मान्यवर तसेच डॉ.सुभाष सुराणा (अध्यक्ष आय एम ए) डॉ अमोल घाडगे ( अध्यक्ष करमाळा मेडिकोस गिल्ड), डॉ.पोपट नेटके (अध्यक्ष करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स) आदी वैद्यकीय क्षेत्रात मान्यवरांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उदघाटन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!