दत्तजयंती निमित्त हिवरवाडीत रंगला कीर्तन सोहळा
करमाळा (दि.२३) – दुसऱ्याचे दुःख वाटून घेण्याची भावना निर्माण होणे अडचणीतल्या माणसाला दया करणे मदत करणे हा विचार जिथे नांदतो येथे संपत्ती आपोआप येते, असे मत ह.भ.प. बाबा महाराज ढवळे हळगावकर यांनी केले. दत्त जयंती निमित्त महेश चिवटे यांच्या हिवरवाडीमधील फार्म हाऊस येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी कीर्तनातून सांगताना बाबा महाराज ढवळे म्हणाले की दुसऱ्याच्या दुःखाला,अडचणीला आनंद म्हणून उपभोगणे ही राक्षस प्रवृत्ती आहे. ज्ञानेश्वर माऊलीने दुसऱ्याला मदत करणे, त्याचे दुःख वाटून गेले व आपल्या मनात प्रत्येकाबद्दल दया व करुणा ठेवा असे सांगितले आहे. समाजात मात्र सध्या नेमकी उलटी परिस्थिती आहे. ज्ञानेश्वर माऊलीचे विचारच आता नव्या पिढीला जीवनाचे महत्त्व सांगू शकतात
शालेय शिक्षणांबरोबर ज्ञानेश्वरीचे वाचन व त्याचा अर्थ व उपदेश विद्यार्थ्यांना देणे ही पालकाची जबाबदारी आहे.
यावेळी ह. भ. प.गुलाब महाराज हाडगळे,ह. भ. प. देविदास गोरे,मृदंग वादक ह. भ. प. प्रवीण वाघ, अजिनाथ पोळ, अण्णा सुपनवर, भाऊसाहेब रोडे, दत्ता कदम, भुजंग वीर, संदीपान काळे, भागवत ढावरे, सर्जेराव वीर, भरत वीर, कांतीलाल वीर, विश्वनाथ शिंदे, अशोक वाघमोडे, बापू लोहार, गोपाळ धोकटे, लक्ष्मण बेरे, उत्तम भोसले, रुपेश राठोड यांनी कीर्तनाला साथ संगत केली. दत्त मंदिर उत्सव समितीच्या वतीने ह.भ.प. नरसिंह चिवटे यांनी कीर्तन कार्यक्रमापूर्वी प्रवचन केले.
या कीर्तन सोहळ्यासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, सौ जयश्रीताई घुमरे, पत्रकार अशोक नरसाळे, नासिर कबीर सिद्धार्थ वाघमारे सचिन जव्हेरी, विशाल परदेशी, अलीम शेख, अण्णा सुपणवर उपस्थित होते. या कीर्तन सोहळ्याचे नियोजन माजी मुख्याध्यापक निवृत्ती सुरवसे यांनी केले होते.
श्रीराम कथेचे आयोजन प्रत्येक गावात आठ दिवस केले तर प्रभू श्रीरामाचा अभ्यास करता येईल व त्यातून नवीन संस्कृत सुसंस्कृत पिढी निर्माण होईल यासाठी प्रत्येक गावातील तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान ह भ प बाबा महाराज ढवळे यांनी केले.