राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार शितलकुमार मोटे यांना जाहीर

करमाळा (ता.29) : टि.व्ही.9 चे प्रतिनिधी शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत जगदीशब्द फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जगदीश ओहोळ यांनी सांगितले आहे.

जादा माहिती देताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील पाथर्डी या गावातून आलेल्या शितलकुमार मोटे यांचे पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून ते नेहमी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करतात. त्यांचे कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्या अनुषंगाने जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने शितलकुमार मोटे यांना ‘राज्यस्तरीय क्रांतिसुर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी, पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ येथे पार पडणार असून सर्व करमाळा व तालुक्यातील साहित्यप्रेमींनी यावेळी उपस्थित राहावे असेही अवाहन श्री. ओहोळ यांनी केले आहे.




