पुस्तक वाचनाला चालना देण्यासाठी   रावगाव येथे 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम आयोजित -

पुस्तक वाचनाला चालना देण्यासाठी   रावगाव येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम आयोजित

0


करमाळा (दि.१) : शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव तालुका करमाळा येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान हा उपक्रम आयोजित केलेला आहे.

शासनाच्या आदेशानुसार ग्रंथालयात स्वच्छता मोहीम राबवून ग्रंथालयातील निवडक ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे सहशिक्षक प्रा. किरण परदेशी प्रा. प्रताप बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘वाचन संकल्प महाराष्ट्र’ हा उपक्रम नववर्षाच्या मुहूर्तावर राबविला जात आहे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थी ग्रंथालयाकडे कसे वळतील हा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये वाचनालयाचे सुशोभीकरण करणे, विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणे ,सामूहिक वाचन, वाचनकौशल्य कार्यशाळा, पुस्तक प्रदर्शन, लेखक वाचक मेळावा, लेखकांची भेट व मुलाखत, वाचन स्पर्धा, नवीन सभासद नोंदणी आदी उपक्रम राबवून वाचन संकल्पनेचा चालना देण्याचे काम होणार आहे.

या कार्यक्रम प्रसंगी प्रा. किरण परदेशी, प्रताप बर्डे सर ,प्रताप राऊत सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बबन पाटोळे, महेंद्र शिंदे सर ,विद्या गंभीर मॅडम ,काळुंखे मॅडम,समता परिषदेचे  तालूका अध्यक्ष प्रशांत शिंदे,ज्ञानेश्वर पवार,  राहुल पवार ,प्रकाश कांबळे, हेमंत पवार आदी उपस्थित होते .  सदरील ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ वाचक व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावगाव येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी घेतला. उपस्थित मान्यवरांचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!